इन्वेस्ट इंडिया कंपनीला जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीचा मान
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया ही भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितली ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली आहे. मेक इन इंडिया अभियानाच्या अंतर्गत इन्व्हेस्ट इंडिया भारतात गुंतवणुक करू इच्छिणार्याइ सर्वांसाठी व्यवसाय उभारणी पासून विस्तारापर्यंत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडते. तिला पुरस्कार मिळाल्याबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इन्व्हेस्ट इंडिया कंपनीचं अभिनंदन केलं आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यात भारत सातत्यानं आघाडीवर राहिला आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.