नवी दिल्ली : चांद्रयान-2 उद्या चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार असून हा क्षण अनुभवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या बंगळुरु इथल्या मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ते देशभरातल्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित अंतराळ प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.
विज्ञान आणि संशोधनाबाबत विशेष रुची असलेल्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे इस्रोच्या वैज्ञानिकांचे मनोबल वाढेल आणि युवकांना संशोधन आणि चौकस वृत्ती जोपासण्यासाठी प्रेरणा मिळेल.
चांद्रयान-2 मोहिमेत वैयक्तिक स्वारस्य दाखवत मोदी यांनी याचे ‘मनाने भारतीय, वृत्तीने भारतीय’ असे वर्णन केले आहे. ही पूर्णपणे स्वदेशी मोहीम असल्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटेल.
विक्रम लॅन्डर, 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरु करेल आणि त्यानंतर दीड ते अडीचच्या सुमाराला लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करेल असे इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे.