Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३८ कोटींचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३८ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल ४० लै ६५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३८ कोटी १४ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४९ हजार ७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी ६३ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३१ हजार ४४३ नवे रुग्ण आढळले. गेल्या ११८ दिवसांमधील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. सध्या देशभरात ४ लाख ३१ हजार ३१५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

Exit mobile version