Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात आठ हजार ६०२ नवे कोविड रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आठ हजार ६०२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ८१ हजार २४७ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ३९० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल सहा हजार ६७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ४४ हजार ८०१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख सहा हजार ७६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल ३२७ कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १९६ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६१, औरंगाबाद ३५, लातूर १९, नांदेड आठ, जालना सात, तर परभणी जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळून आला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

Exit mobile version