मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील – आरोग्यमंत्री
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं. ते आज बातमिदारांशी बोलत होते. या विषयी मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिके सोबत चर्चा करतील. ज्या नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांना प्रवास करायला परवानगी देण्याबाबत सतत मागणी होत आहे, या प्रश्नावर टोपे म्हणाले की या संदर्भात कृती दला बरोबर विचार विनिमय केल्यानंतर सकारत्मक निर्णय घेतला जाईल. राज्यात पुन्हा टाळेबंदी केली जाणार का या विषयी ते म्हणाले की राज्यातली ९२ टक्के रुग्णसंखा १० जिल्ह्यांमध्ये आहे. तर उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रु्णसंख्या आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यातली रुग्ण संख्या स्थिर असली तरी ती खाली येत नाही आहे, असंही ते म्हणाले.