Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशीरोपण

मुंबई: उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण निसर्ग व ऋतुचक्राशी जोडलेला आहे. केवळ आपल्या देशात वड, पिंपळ, आवळा आदी विविध वृक्षांची व पशुपक्षांची पूजा केली जाते, असे सांगून निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असा संदेश राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी दिला.यावेळी मूळच्या उत्तराखंड येथील लोकांच्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांच्या डोक्यावर नवतृणांकुर अर्पण करून परस्परांना हरेला पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामूसिंह राणा, उद्योजक के एस पंवर, तुलसी फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर फुलोरीया, गढवाल भ्रातृ संघाचे उपाध्यक्ष दयाराम शाती, महेंद्र सिंह गोसाई, अमरजित मिश्र, अजय बोहरा, आदी उपस्थित होते. 

Exit mobile version