Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लसींच्या दोन्ही मात्र घेतलेल्या असल्यास राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही

New Delhi: Health workers collect swab sample of a person at Indo-Israel Non-Invasive Raid Covid -19 test study camp as part of Operation Open Skies, at Dr Ram Manohar Lohia Hospital in New Delhi, Friday, July 31, 2020. (PTI Photo/Kamal Kishore) (PTI31-07-2020_000030B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्यांनी कोविड प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील आणि त्यावर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना आता राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त केलेलं अधिकृत प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे, असे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असं या आदेशात स्पष्ट केलं आहे.ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना मास्क, शारिरीक अंतर, वेळोवेळी हात स्वच्छ धुणं इत्यादी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणन बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या वैधतेचा काळ ४८ तासांवरून वाढवून ७२ तास इतका केला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Exit mobile version