Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईत पावसामुळे झालेल्या तीन दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले. चेंबूर इथं भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला तर, ५ जण जखमी झाले. विक्रोळी इथं पावसामुळे झोपड्यांवर दरड कोसळल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला तर, एकजण जखमी झाला. भांडुपमध्येही भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. चांदवली इथं अशाच दुर्घटनेत २ जण जखमी झालेत. या दुर्घटनांबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचं तसंच जखमींवर मोफत उपचार करायचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

Exit mobile version