Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल ५१ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ४० कोटी ४९ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४१ हजार १५७ नवे रुग्ण आढळले. तर, ५१८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख १३ हजाराच्या वर गेली आहे. देशभरात सध्या ४ लाख २२ हजार ६६६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

Exit mobile version