विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग – यूजीसीने २०२०-२१ चं शैक्षणिक वर्ष ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला एक ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक दिनदर्शिका यूजीसीने काल जारी केली, त्यात २०२०-२१ च्या सत्र परीक्षा तसंच अंतिम वर्षांच्या परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यास सांगितलं आहे. सर्व उच्च शिक्षण संस्थांना ऑफलाईन, ऑनलाईन किंवा दोन्हीचा सहभाग असलेल्या संयुक्त पद्धतीनं या परीक्षा घेता येतील, त्यासाठी कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन आवश्यक असणार आहे. १२ वी परीक्षेच्या सर्व अभ्यास मंडळांचे निकाल ३१ ऑगस्टपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२१-२२ या नव्या शैक्षणिक वर्षातली पदवी प्रवेश प्रकिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून, एक ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करण्याची सूचना यूजीसीने केली आहे.