Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा झाली. कोरोनाचं संकट दूर व्हावं, जनतेला पुन्हा आनंदी आणि निरोगी आयुष्य जगता यावं, असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी  पांडुरंगाच्या चरणी घातलं.

मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातले विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते यांना मिळाला.आजच्या या महापूजेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित होते. पंढरपूर नगरपरिषदेला राज्य शासनाच्या वतीनं यात्रा अनुदानाचा पाच कोटी रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द केला.

आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलं होतं. मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाला होता.यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते.

Exit mobile version