Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507 जणांच्या मृत्युची नोंद झाली. सध्या 4 लाख 9 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण सध्या 97 पूर्णांक 35 शतांश टक्के आहे. कोविड-19 मुळं देशात आजवर दगावलेल्यांची संख्या 4 लाख 18 हजारांवर गेली आहे. कोविड प्रतिबंधक लसींच्या 41 कोटी 78 लाखांहून अधिक मात्रा आजवर देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात 22 लाख 77 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

Exit mobile version