Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मोशी प्राधिकरणातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त !

मोकाट कुत्रे, भटक्या जनावरांच्या त्रासापासून नागरिकांची होणार सुटका – भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या मागणीवर ‘क्विक ऍक्शन’

पिंपरी : मोशी, प्राधिकरण परिसरात मोकाट कुत्रे, भटकी जनावरे, त्यांच्याकडून नागरिकांवर होणारे हल्ले आणि त्रास याबाबत पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पिंपरी महापालिकेला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. दरम्यान त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत परिसरात मोकाट जनावरे पकडण्याची गाडी पाठविण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करत याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मोशी, प्राधिकरण सेक्टर नंबर ४ व ६ येथे दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, या भागात अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. सकाळी ‘वॉक’ साठी जाणाऱ्यांच्या मागे धावणे, रात्री भटक्या कुत्र्यांची टोळकी बहुतांश कॉलनीत भ्रमंती करतात. ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत. रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस  वाढला आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढली आहे. या नागरिकांना सद्या मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकाना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते.

रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्री भटक्या कुत्र्यांची टोळकी बहुतांश कॉलनीत भ्रमंती करतात. ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत. रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे अशा प्रकारे या भटक्या कुत्र्यांचा धुडगूस सुरू आहे. त्यामुळे महापालिका पशुवैद्यकीय विभागाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवराज लांडगे यांनी महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी तथा सहायक अधिक्षक डॉ. अरुण दगडे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मोकाट जनावरे पकडण्याची गाडी परिसरात रवाना केली. त्यावेळी काही मोकाट जनावरे पकडण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनीही पाहणी करून वेळोवेळी गाड्या पाठवून तसेच आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले.

समस्या संपेपर्यंत पाठपुरावा करणार…
परिसरात मोकाट जनावरांचा त्रास असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी माझ्याकडे केली. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका पोहचू शकत असल्याने विषयाची गंभीरता लक्षात घेतली. याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा व कार्यवाही कर्णयःची मागणी केली. सध्या जनावरे पकडण्याची गाडी वेळोवेळी परिसरात फिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी आभार मानले. अधिकाऱ्यांनी हा विषय सोडवणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी, ही समस्या संपेपर्यंत मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती शिवराज लांडगे यांनी दिली.

Exit mobile version