जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे.
संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे आयोजक आणि पत्रकार, अशा फक्त ९५० जणांना स्टेडियममध्ये परवानगी असेल. या सोहळ्यात भारतातर्फे केवळ २८ जण सहभागी होतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता हा सोहळा सुरू होईल.सोहळ्यात मनप्रीत सिंग आणि मेरी कोम हे भारतीय पथकाचे नेतृत्व करतील.
तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, टेनिस, नेमबाजी आणि हॉकी या खेळांचे सामने आज आणि उद्या असल्याने त्यातले खेळाडू आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतील. आकाशवाणी, दूरदर्शन आणि डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर ऑलिम्पिक स्पर्धेचे विशेष वार्तांकन करण्यात येणार आहे. डीडी स्पोर्ट्सवर रोज पहाटे ५ ते संध्याकाळी सात या वेळेत विविध स्पर्धांचं थेट प्रक्षेपण होणार आहे. सॉफ्टबॉल आणि फूटबॉलचे सामने कालपासून सुरु झाले आहेत.