गेले अनेक दिवस बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करा- युनिसेफद्वारे आवाहन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरात लवकर सुरु झाल्याचं पाहिजेत असं, युनिसेफचे प्रवक्ता जेम्स एल्डर यांनी जिनेव्हा इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. शाळा बंद असल्यामुळे जगभरात ६० कोटी मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात असल्यामुळे शाळा सुरु करणे श्रेयस्कर असे त्यांनी स्पष्ट केलं. शाळेतलं सुरक्षा, मैत्री आणि अन्नवाटपाची संस्कृती सध्या अस्वस्थता, हिंसा आणि युवती गरोदरपणा यात बदललेली दिसत आहे, असंही ते म्हणाले. शाळांच्या आधी बार आणि पब सुरु होणं ही मोठी चूक असल्याचं त्यांना स्पष्ट केलं. सगळ्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं लसीकरण होईपर्यंत शाळा बंद ठेवू शकत नाही, त्यामुळे सरकारांनी शैक्षणिक आर्थिक तरतुदी कायम ठेवाव्यात, असं त्यांनी स्पष्ट केलं.