Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय

Bombay High Court at Mumbai is one of the oldest High Courts of India

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली. सिनेमांच्या शेकडो वाहिन्या असतांना शिक्षणासाठी एखादी २४ तास चालणारी वाहिनी का नाही? असं न्यायालयानं विचारलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेची स्वतंत्र दूरचित्रवाहिनी आहे, तशीच शिक्षणासाठीही असायला हवी. याचा केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा, अशी सूचना न्यायालयानं केली. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करून येत्या गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचनाही मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.

Exit mobile version