राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वीच्या निकालात ९९ पुर्णाक ६३ शतांश टक्के
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वीचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. यंदा ९९ पुर्णाक ६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य विभागात सर्वाधिक ९९ पूर्णांक ९१, त्याखालोखाल कला विभागात ९९ पूर्णांक ८३ तर विज्ञान विभागातले ९९ पूर्णांक ४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक ९९ पूर्णांक ८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीच्या निकालतही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ९९ पूर्णांक ७३ तर मुलांचं प्रमाण ९९ पूर्णांक ५४ टक्के इतकं आहे. सर्व विद्यार्ध्यांना संध्याकाळी ४ नंतर ऑनलाईन पद्धतीनं आपले निकाल पाहता येतील.