Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीत देश आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर असल्याचा हा विश्वास आहे. प्रभावी वितरण व्यवस्था, आधार कार्ड आणि शिधापत्रिका जोडणी अशा बाबींमुळे कोणावरही उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थींशी थोड्या वेळापूर्वीच संवाद साधताना ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरु असून या योजनेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 च्या प्रतिबंधांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळांत गरजूंना मदत आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या योजनेतील लाभार्थींना या योजनेअंतर्गत अतिरिक्त पाच किलो धान्याचं वाटप केलं जातं.

Exit mobile version