Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी ‘किसान रथ’ हा मोबाईल अॅंप विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं देशभरातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी घटकांच्या उत्पादित शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याकरिता करावी लागणारी कसरत कमी व्हावी आणि बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी ‘किसान रथ’ हा मोबाईल अॅंप विकसित केला आहे.

 या अॅलपच्या माध्यमातून वाहतुकदार संघटना तसंच वैयक्तिक वाहतुकदार यांच्याकडून शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर यांची उपलब्धता होत आहे. शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या शेतमालाची बाजारपेठ, गोदाम, रेल्वे स्थानक, विमानतळ आदी ठिकाणी पोहचविण्यासाठी या अॅहपव्दारे वाहने मिळत आहे. शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच वाहतुकदार आदींनी ‘किसान रथ’ अॅयप प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करुन या अॅपवर नोंदणी करावी. हा अॅटप वापरण्यासाठी सोयिस्कर असून स्थानिक वाहतुकदारांना या अॅयपव्दारे व्यवसाय उपलब्ध होत असून व्यापार वाढविण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे.

स्थानिक वाहतुकदार या मोबाईल अॅटपवर नोंदणी करण्यासोबतच अधिकच्या माहितीसाठी नजिकच्या बाजार समित्यांशी संपर्क करु शकतात. केंद्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार शेतमालाच्या वाहतुकीसाठी ५ लाखांवर ट्रक व २० हजारांपेक्षा अधिक ट्रॅक्टर या अॅहपवर उपलब्ध आहेत. राज्यातील ११ हजार ९२७ ट्रक, ३४० ट्रॅक्टर, २ हजार २०० वाहतुकदार, १० हजार ट्रेडर, ३१८ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि २५० बाजार समित्यांनी या अॅरपवर नोंदणी केली आहे.

Exit mobile version