Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो  पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा रशियन ऑलिंपिक कमेटीच्या खेळाडूनं  ७-४  असा पराभव केला. पराभव करत सुर्वणपदक पटकावलं. आज सकाळी पुरष हॉकीत भारतीय संघानं आज कांस्य पदक जिंकत, या खेळात गेल्या चार दशकांतला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. कांस्य पदकासाठी आज झालेल्या सामन्यात भारतनं जर्मनीचा ५-४ असा पराभव करत ऐतिसाहिक विजयाची नोंद केली. याआधी भारताच्या हॉकी संख्यानं १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरचं पदक जिंकलं होतं. हॉकीत कांस्य पदक जिंकल्यानंतर देशभरातून भारतीय संघाचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीगी या विजयाबद्दल भारताच्या हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. महिलांच्या कुस्तीत ५३ किलो वजनी गटात भारताच्या विनेश फोगटचा उपान्त्य फेरीत पराभव झाला, मात्र अजुनही तिला कांस्यपदकाची संधी आहे.

Exit mobile version