Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी महिला हॉकी संघ, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया आणि इतर खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर गदारोळ सुरू झाल्यानंतर कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर करप्रणाली कायदे सुधारणा विधेयक २००१ आणि केंद्रीय विद्यापीठं सुधारणा विधेयक २०२१ ही विधेयकं गोंधळातच मंजूर करण्यात आली. नंतर गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज सोमवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर गोंधळामुळं पहिल्यांदा बारा वाजेपर्यंत आणि नंतर सोमवार सकाळपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं.

Exit mobile version