कोरोना प्रतिबंधक लसीकरणात देशानं केला ४९ कोटींचा टप्पा पार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ४९ कोटी ५३ लाख लसी पुरवण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या २४ तासांत ५७ लाख ९७ हजार मात्रा देण्यात आल्या. सध्या देशातला कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३६ शतांश टक्के असून गेल्या चोवीस तासात ४१ हजार रुग्ण बरे झाले आहेत. काल ४४ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात ४ लाख १४ हजार १५९ रुग्ण उपचार घेत आहेत.