Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत योगसाधना शिबीर

पिंपरी : मानिनी फाऊंडेशन ही महिलांच्या आरोग्य, मानसिक आणि आर्थिक सक्षमतेसाठी सामाजिक काम करणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. डॉ. भारती चव्हाण यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने कोरोना कोविड -19 चा संसर्ग देशभर वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. कोरोनामुळे सुरु असणा-या लॉकडाऊन काळात महिला भगिनींचे स्वता:च्या शारिरीक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा विचार करुन मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महिलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मोफत योगसाधना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मानिनी फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

योग शिक्षक रविंद्र परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त महिला व युवतींसाठी दि. 15 ऑगस्ट पासून फक्त नोंदणीकृत व्हॉटस्‌अप ग्रुपवर बेसिक योगासन वर्ग सुरु करण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणा-या महिलांनी आपली नोंदणी मानिनी फाऊंडेशन परिवारच्या अर्चना – फोन नंबर — 9561880176 या क्रमांकावर फक्त व्हॉट्सॲप वर आपले नाव, पत्ता, वय याची नोंदणी 13 ऑगस्ट 2021 सायंकाळी 7 वाजेपर्यंत करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हा पंधरा दिवसांचा बेसिक योगसाधना कोर्स फक्त व्हाट्सअप्प ग्रुप वर होणार आहे. याचे ऑनलाईन वर्ग नाहीत. याला वेळेचे बंधन नाही, सोयीनुसार अभ्यास आणि सराव करता येईल. या वर्गात योगशास्राचा परिचय, योगाभ्यासाची तयारी, ओंकार साधना, प्रार्थना, गुरुवंदना, श्वसन मार्गशुद्धी, सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार – निवडक प्राथमिक आसने, प्राणायाम पार्श्वभूमी व अभ्यास, दैनंदिन सराव मार्गदर्शन, आहार मार्गदर्शन करण्यात येईल. योगाचार्य रविंद्र परांजपे हे स्वता: सहभागी व्यक्तींच्या शंकांचे व्हॉटस्‌अप ग्रुपवरच निरसन करतील. अशीही माहिती मानिनी फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

Exit mobile version