ओबीसी समाज केंद्रस्थानी राहण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज – विजय वडेट्टीवार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंडल आयोग शंभर टक्के लागू झाला असता तर ओबीसी समाजाबरोबर मागासवर्गीय समाजही सुखी झाला असता मात्र प्रस्थापित व्यवस्थेनं तस होऊच दिल नाही, असं मत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. मंडल आयोग लागू दिनानिमित्त जालना जिल्ह्यातल्या दोदडगाव इथ देशातल्या पहिल्या मंडल स्तंभावर आयोजित सामाजिक न्याय मेळाव्याच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होत. ओबीसी समाज हा केंद्रस्थानी कसा राहील, यासाठी एकसंघ राहून सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे इत्यादी उपस्थित होते.