राज्यात १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ५ कोटींपेक्षा जास्त थाळ्यांचं वाटप
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्य शासनाच्यावतीनं गरीब आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं कळवलं आहे. राज्यात सध्या १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून या थाळ्यांचं वाटप केलं जातं. या केंद्रांमधून १५ एप्रिल ते ७ ऑगस्ट या काळात १ कोटी ७२ लाख ३२ हजार ६९५ मोफत थाळ्यांचं वितरण केलं गेलं. जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी मोफत ९२ हजार १७ थाळ्याचं वाटप केलं गेलं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.