राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी १४ मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, जालना आणि लातूरसह १४ जिल्ह्यात स्वतंत्र कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. राज्याच्या कृषी आणि पणन विभागातर्फे संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यांचे संपर्कमंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्रांचे उद्घाटन केलं जाणार आहे.