नागपूर : मुख्यमंत्री सहायता निधीस दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार कृष्णा गजभिये, दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार उपस्थित होते.