इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी निती आयोगातर्फे मार्गदर्शक पुस्तिका जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी धोरणं आणि नियमावली तयार करण्याच्यादृष्टीनं निती आयोगानं राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहेत. देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकांबाबतच्या पायाभूत सोयी सुविधा वाढाव्यात, तसंच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगानं वाढावा हा यामागचा उद्देश आहे. निती आयोग, उर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, उर्जा सक्षमीकरण संस्था आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे ही मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.