पूरग्रस्त भागातल्या व्यवसायिकांना अल्पव्याज दरानं कर्ज उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीनं पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तिथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ ५ ते ६ टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध होणार आहे.