राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे मुंबईत लोकार्पण
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आज मुंबईत करण्यात आलं. दादर मध्ये असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळावर उभारण्यात आलेल्या या केंद्राचं लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. लवकरच मुंबईत आणखी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वाहनतळात चार डीसी आणि तीन एसी अशा दोन प्रकारचे सात चार्जर बसविण्यात आले आहेत. याद्वारे २४ तासात सुमारे ७२ वाहने चार्ज होऊ शकतील. यामध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. नागरिक ऑटोपार्क मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पार्किंग बुक आणि आरक्षित करू शकतात.