Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू आहे. एका कंत्राटदाराकडून २ लाख रुपये लाच स्वीकारली म्हणून स्थायी समितीचा लिपिक आणि शिपाई यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या वारंवार छापून येतात. त्याच्या आधारावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर छापा टाकला.

Exit mobile version