राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज- डॉ. भारती पवार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेदरम्यान त्या काल नंदुरबारमध्ये बोलत होत्या. प्राणवायू अभावी कोरोना विषाणू बाधित किती रुग्णांचा मृत्यू झाला, याबाबत राज्याकडून केंद्राला अद्याप माहिती मिळालेली नसल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या सर्वाधिक मात्रा महाराष्ट्राला देण्यात आल्या असून, राज्यातल्या एक लाख मात्रा वाया गेल्याचंही त्या म्हणाल्या.