Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हिंसाचार आणि दहशदवादी कारवायांनी ईश्वरावरील अतूट श्रद्धा तोडता येत नाही- प्रधानमंत्री प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक प्राचीन तीर्थक्षेत्राशी तिथलीस्थानिक अर्थव्यवस्था जोडलेली आहे, त्यामुळं श्रद्धा परंपरा आणि आधुनिकता यांचासंगम करून धार्मिक पर्यटन, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असून, सरकारत्यासाठी प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल. गुजरातमधील श्री क्षेत्र सोमनाथ मंदिर इथल्या अनेक प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रकल्पांमध्ये सोमनाथ विहार, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा जिर्णोधार आणि नव्यानं बांधण्यात येणाऱ्या श्री पार्वती माता मंदिरच भूमिपूजन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला गृहमंत्री आणि मंदिराचे विश्वस्त अमित शाह, मुख्यमंत्री विजय रूपानी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी मान्यवर दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयाद्वारे स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत ४७ कोटी रुपये खर्च करून सोमनाथ विहारचा विकास करण्यात आला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, १२ ज्योतिर्लिंगापैकी सर्वात प्रथम असणाऱ्या भगवान सोमनाथांच मंदिर हे गेली हजारोवर्ष प्रभास क्षेत्र अर्थात भारताच्या गौरवशाली ज्ञान परंपरेच प्रतीक राहील आहे.

आतापर्यंत अनेक शतकात हे मंदिर उध्वस्त करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला, मात्रत्याचं पुन्हा पुन्हा जिर्णोधार होत राहिला. हिंसाचार आणि दहशदवादी कारवायांनी ईश्वरावरील अतूट श्रद्धा तोडता येत नाही, असत्यानं सत्य नष्ट करता येत नाही हेच सोमनाथ मंदिरावरून सिद्ध होत असं ही मोदी यांनी सांगितल. या मंदिराच १७८३ मध्ये पुनर्निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आणि स्वातंत्र्यानंतर आधुनिक सोमनाथ मंदिराची आधारशीला बसवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच कृतज्ञता पूर्वक स्मरण करून, पंतप्रधानांनी या भव्य मंदिर परिसराच्या विकासाच स्वप्न, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केल.

भारतात १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याच काम करत असून, सध्या जगातभारतीय अध्यात्म, योग,आयुर्वेद याबद्दलच आकर्षण वाढत असून, पूर्वजांनी जोडलेल्या या प्राचीन तीर्थस्थानाना पुन्हा आधुनिकतेच्या सहाय्यानं जोडण्याच काम सरकार करत आहे, पर्यटन मंत्रालयाने अशा ४० तीर्थक्षेत्रांचा विकास धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सुरु केला आहे, अशी माहिती हि पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

Exit mobile version