प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांच्याबरोबर बैठक घेत त्यांच्याकडं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. करदात्यांना वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी पारेख यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं. इन्फोसिसनं अधिक मनुष्यबळ वापरून आणि अधिक प्रयत्न करून ही अडचण दूर करायला हवी, असं सीतारामन यांनी पारेख यांना स्पष्टपणे सांगितलं. पोर्टलचा वापर करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळं करदाते हैराण असल्याची पारेख यांना जाणीव करून देत सीतारामन यांनी, पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर होणं आवश्यक असल्याचं त्यांना सांगितलं.