Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे ३ लाख १९ हजारापर्यंत खाली आली असून आतापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. काल देशभरात ४९ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी १७ लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल २५ हजार ४६७ नवे रुग्ण आढळले.देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ५८ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ६३ लाख ८५ हजारपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Exit mobile version