Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची कामगिरी; मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीस असलेले एकूण ३०१ पेट्यांमध्ये परराज्यातील अवैध विदेशी दारू साठा करून त्याची विक्री करण्याचा उद्देश फरार आरोपीचा होता. या फरार आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्रोव्ही. अॅक्ट १९४९ चे कलम ६५ (ई), ८१, ८३ व ९० नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. गोवा राज्यात विक्रीस असलेले मद्यसाठासह एकूण रु.१८,८०,२४०/- इतक्या किंमतीचा गुन्ह्याच्या माल जप्त करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.

Exit mobile version