दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी तालिबानला जबाबदार धरण्याचा G7 सदस्य देशांचा इशारा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघन यासाठी तालिबानला जबाबदार धरलं जाईल असं G7 सदस्य देशांच्या नेत्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यानेत्यांची काल आपात्कालीन बैठक बोलावली होती. अफगाणी नागरिकांच्या पाठिशी उभे राहण्याचं तसंच मानवतेच्या दृष्टीकोनातून निर्वासितांना मदत करण्याचं काम यापुढेही सुरू ठेवावं असं आवाहन बोरीस जॉन्सन यांनी सदस्य देशांना यावेळी केलं.तालिबाननं अमेरिकेसाठी सैन्य माघारीची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली आहे. पण यानंतरही सुरक्षितपणे सैन्य माघारीची हमी तालिबाननं द्यावी अशी विनंती या बैठकीत करण्यात आली. अफगाणी नागरिकांना विशेषतः मुली आणि महिलांना सन्मानानं, शांततेत तसंच सुरक्षित वातावरणात जगण्याचा हक्क आहे याचा पुनरुच्चार या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी केला.