Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात आतापर्यंत ६० कोटी ३८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६० कोटी ३८ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. देशात काल एकूण ८० लाख ४० हजार मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात काल ४६ हजार १६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३४ हजार १५९  रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६३ शतांश टक्के आहे.  सध्या देशभरात ३ लाख ३३ हजार ७२५  रुग्ण उपचाराधीन आहेत.

Exit mobile version