देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. काल देशभरात ४४ हजार ६५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३२ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी १८ लाख २१ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरानामुक्त झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६ दशांश टक्के आहे. सध्या देशभरात ३ लाख ४४ हजार ८९९ रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण १ पूर्णांक ६ शतांश टक्के आहे.