मुंबईत पालिकेने सज्ज ठेवलेल्या ३० हजार बेड पैकी २९ हजार ५०० बेड रिक्त
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यामुळे पालिकेने सज्ज ठेवलेल्या ३० हजार बेड पैकी फक्त ५०० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे २९ हजार ५०० बेड रिक्त आहेत. सध्या सक्रिय असलेल्या २ हजार २५५ रुग्णांमधील निम्म्याहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्यानं ते घरीच क्वॉरंटाईन असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली. सध्या रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये बेड रिक्त असले तरी तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पालिका सतर्क आहे.