विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लोकार्पण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाच्या वतीनं मागाठणे इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना छडी, वॉकर, व्हिलचेअर, कानाचे मशीन, चष्मे, कृत्रिम दात, व्हिलचेअर कमोड, ट्रायपॉड, पेट्रापॅाड आदी यंत्रे आणि उपकरणे दिली जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात अनेक समस्या भेडसावत असतात. या वयात शरीर साथ देत नाही. त्यामुळे त्यांना उत्तम आयुष्य जगता यावं, याकरता यंत्रं आणि उपकरणं यांची आवश्यकता असते. पण ती महाग असल्यामुळे ती त्यांना घेता येत नाहीत. म्हणून भाजपा ही उपकरणे ज्येष्ठ नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे, असं मत दरेकर यांनी यावेळी सांगितलं.