प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्यानं उभारण्यात आलेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी व्हिडीओ कॉन्फेरंसिन्गच्या माध्यमातून प्रधानमंत्री या स्मारकाचं लोकार्पण करतील. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या स्मारकात उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचंही लोकार्पण होईल.
मुंबई पत्र सूचना कार्यालयानं आयोजित केलेल्या स्वातंत्र्य चळवळीत मुंबईची भूमिका या वेबिनार मध्ये स्वातंत्र्य सैनिक रोहिणी गवाणकर आणि स्तंभलेखिका अनुराधा रानडे , प्राध्यपक अनुराधा पेंडसे यांनी आपले विचार मांडले. रोहिणी गवाणकर यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुंबईची भूमिका मांडताना संपूर्ण इतिहास उलगडून सांगितला.
स्वातंत्र्य लढ्यातल्या शेवटच्या टप्पयात प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर मुंबईतल्या मॅडम कामा या लहान मुलीनं हि चळवळ सुरु ठेवली त्यांनी देशाचा पहिला झेंडा फडकावला असं गवाणकर यांनी सांगितलं. दादा भाई नौरोजी यांच्या दोन नातवांनी घरोघरी जाऊन खादीचा प्रसार केला असंही त्यांनी सांगितलं.