Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी एक असलेला मुल्ला अब्दुल घनी बरादर हाच तालिबानच्या सरकारचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. इराणच्या धर्तीवरच तालिबानचं सरकार असण्याचा अंदाज आहे. यानुसार, मुल्ला हेबतुल्ला आखूनजादा हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च प्रमुख असेल.

अफगाणिस्तानमधला आतापर्यंत तालिबानच्या ताब्यात न आलेल्या पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला आहे. नॅशनल अलायन्स या तालिबानविरोधी आघाडीचे नेते अमरूल्ला सालेह हे अफगाणिस्तान सोडून पळून गेल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, पळून गेल्याबाबतचं वृत्त चुकीचं असून मी पंजशीरमध्येच आहे, असं सालेह यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तालिबानकडून पंजशीरवर हल्ले केले जात आहेत, मात्र त्यांना फारसं यश मिळालं नसल्याचा दावा सालेह यांनी केला. तालिबानला पाकिस्तानी लष्कराचं सहकार्य मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version