पुणे : आदर्श गाव योजने अंतर्गत सहभाग घेत असलेल्या गावातील उत्कृष्ट काम करणारे गाव, उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता यांना महाराष्ट्र आदर्शगाव भुषण पुरस्कार व शासन स्तरावरून उचित पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्कार प्रदान सोहळा जलसंधारण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशदा, पुणे येथे 11 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे पुणे विभागाचे उपसंचालक यांनी दिली आहे.