हिमाचल प्रदेशात सर्व पात्र लाभार्थींना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये संपूर्ण पात्र लोकसंख्येला यशस्वीरित्या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देऊन झाली आहे. कठीण भूभागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भौगोलिक प्राधान्य देणं, मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणं आणि आशा कामगारांच्या मदतीनं घरोघरी जाऊन भेट देणं अशा प्रयत्नांचा हिमाचल प्रदेशच्या यशात मोठा वाटा आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगजन, औद्योगिक क्षेत्रामधील कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर सरकारने विशेष प्राधान्य दिलं. हा महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी सुरक्षेची युक्ति, कोरोनापासून मुक्ती यांसारख्या विशेष मोहिमा सरकारने हाती घेतल्या होत्या.