Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण पुढाकारांसह उद्यापासून देशात शिक्षक पर्वाचा आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या शिक्षक पर्वाचं उद्घाटन करणार असून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधनही करणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ ते करणार आहेत.

यामध्ये भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश म्हणजेच श्रवण दिव्यांगांसाठी युनिव्हर्सल डिझाईन ऑफ लर्निंगशी संलग्न अशा ध्वनी आणि संहिता मिश्रित सांकेतिक भाषेचा विडियो, टॉकिंग बुक्स म्हणजे दृष्टिहीनांसाठी ऑडिओ पुस्तकं आणि सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं शालेय गुणवत्ता आश्वासन आणि रचनेचं मूल्यांकन अशा उपक्रमांचा समावेश आहे.

शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवक, देणगीदार आणि कंपन्यांद्वारे सामाजिक जबाबदारी  यांना प्रोत्साहन देण्यासाठी निपुण भारत आणि विद्यांजली पोर्टलसाठी निष्ठा या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ देखील ते करणार आहेत.

गुणवत्ता आणि शाश्वत शाळा- भारतामधील शाळेतील शिक्षण हा ‘शिक्षक पर्व २०२१’ चा विषय आहे. या पर्वामुळे नावीन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन मिळून सर्व स्तरांवर शिक्षणाचं सातत्य सुनिश्चित करण्याबरोबरच शाळांमधील गुणवत्ता, सर्वसमावेशक पद्धती आणि स्थिरता देखील राखली जाणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version