शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावतं, असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं शिक्षक पर्वाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. देश सध्या आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असून, स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवात देशाचं प्रगतीशील रुप प्रत्यक्षात येण्यासाठी आत्ताच संकल्प करणं आवश्यक असून, आजच्या नव्या योजना भविष्यातल्या भारताला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं, प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. नवीन शैक्षणिक धोरण बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात तज्ञ, शिक्षक यांनी मोठं योगदान दिलं असून, आता यामध्ये समाजाला सहभागी करून घ्यायला हवं, असं ते म्हणाले.यावेळी प्रधामंत्र्यांनी भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष, तसंच ‘निष्ठा’ या शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमासह अनेक उपक्रमांची त्यांच्या हस्ते सुरुवात केली.