Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय रिझर्व बँकेचे सहकारी बँकांसंदर्भातलं नवीन धोरण म्हणजे सहकारी बँकांच्या विलनीकरणाचा घाट असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) :भारतीय रिझर्व बँकेचं सहकारी बँकांसंदर्भातलं नवीन धोरण म्हणजे सहकारी बँकांचं विलनीकरण करण्याचा घाट आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या ते आज पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. नवीन धोरणामुळे सहकारी बँका बंद होतील, याचा सामान्य नागरिकांनी फटका बसेल. या नवीन धोरणा विरोधात सर्व सहकारी बँकांनी एकत्र येऊन न्यायालयात आव्हान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. सहकारी बँकांनी महाराष्ट्रच्या विकासात महत्त्वाची भूमीका बजावली आहे, असंही ते म्हणाले. केंद्र सरकार  ईडी, अर्थात सक्तवसूली संचालनालयाचा गैरवापर करत असून, ईडी ची अशा प्रकारची कारवाई आपण आजपर्यंत पाहिली नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

Exit mobile version