मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ लाख युवक-युवतींना पुढच्या ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, वित्त पुरवठा, विमा आणि संबधित विषयांमधलं प्रशिक्षण देऊन, रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी आज महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार झाला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यावेळी उपस्थित होते. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना, राज्यातल्या युवक-युवतींना मिळणारं हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असं मलिक यांनी यावेळी सांगितलं. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सुमारे ३ ते ५ महिने चालणारं हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करुन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.ईन पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.