देशाच्या खाणकाम क्षेत्रात शाश्वत सुधारणा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा केंद्राचा विचार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खाण क्षेत्रात शाश्वत- सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, खाण आणि खनिज विकास नियमन कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 100 हून अधिक ‘जी-चार’ खनिज खंडांचे अहवाल, विविध राज्यांना केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल सुपूर्त केले. यावेळी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात खाण क्षेत्राचं योगदान अडीच टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. खाण मंत्रालय खाजगी उत्खनन कंपन्यांसाठीची मान्यता प्रक्रिया, अंतिम करण्याच्या टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली . लिलाव प्रक्रिया जलद होण्यासाठी खनिज खंडांचे अहवाल मिळालेल्या राज्यांनी त्यावर विनाविलंब कार्यवाही करण्याचं आवाहन जोशी यांनी यावेळी केलं.